शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तार विवादाबद्दल नुकतंच ऐकलं, वाचलं आणि लक्षात आलं की काही इतिहासपुरुषांना आपण आदरार्थी नावाने संबोधतो आणि काहींचा एकेरी नावाने उल्लेख करतो.
स्वातंत्र्य संग्रामातल्या नेत्यांना आपण एकेरी संबोधत नाही, अपवाद झाशीच्या राणीचा.
त्याहून मागे गेलो की तुकाराम, ज्ञानेश्वर हे ग्यानबा, तुकाराम, तुकोबा या एकेरी नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराज आणि स्वामी समर्थ मात्र आदरार्थी. साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज हेही आदरार्थी.
राजांमध्ये चंद्रगुप्त, अशोक पासून राणा प्रताप,अकबर, औरंगजेब सगळ्यांचा एकेरी उल्लेख.
इतिहासात साधारण किती मागे गेलो की आदरार्थी मागे पडून एकेरी उल्लेख सुरू होत असतील?
आणि यातही शंकराचार्यांसारखे अपवाद आहेत. महाराज, स्वामी, आचार्य अशी उपाधी असली की बहुतेक एकेरी संबोधन रूढ होत नाही.
शिवाजी महाराज चौथीच्या पुस्तकातून भेटीला यायचे, पण शिवबा म्हणून जास्त लक्षात राहायचे. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगणारे कुठलेही मराठी आजी आजोबा शिवाजीच्याही गोष्टी सांगायचे आणि त्या गोष्टींतल्या शूर, हुशार, कर्तबगार शिवाजीचा देवांसारखा एकेरी उल्लेखच व्हायचा. आपला सगळ्यांचा शिवाजीराजा, महाराज होऊन विशिष्ट चौकटीत कधीपासून बंदिस्त व्हायला लागला काय माहित... "जो दिल में है वो 'तू' है; 'आप' कहना महज तकल्लुफ़ है", असा काहीतरी एक शेर आहे...
देव सुदैवाने अजून अहो जाहो कॅटेगरीत गेले नाहीयत.
हिंदीत रामजी, देवो के देव महादेव आहेत, पण कृष्ण मात्र लाडका कान्हा आहे. मधुराभक्तीत तर थेट प्रियकर आहे( सूफी साहित्यात मात्र उलट आहे; भक्त प्रियकर आहे आणि ईश्वर प्रयेसी..) सर्व स्त्रीदेवतांचा मात्र सगळीकडेच एकेरी उल्लेख आहे.
आपल्या मायमराठीत देवांचे उल्लेख एकेरीच केलेले आहेत. राम, कृष्ण, शंकर, गणपती, अंबाबाई, तुळजा भवानी.... 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' काय आणि 'ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा' काय, सबकुछ एकेरी.
दत्त मात्र कधीकधी गाणगापूरचे दत्तमहाराज म्हणवले जातात.
विठ्ठल तर अगदी घरातला देव. विठू माऊली, विठोबा, मायबाप, विठ्या सुद्धा असतो तो. आमच्या आईंचा तर फार जिवलग, अगदी शिव्या सुद्धा खाणारा. कुठे काही वाईट घडलं की आई सुरू करतात... "या विठोबाला तर ना आजकाल काही कळेनाच झालंय, बहिरा झालास की डोकं कामातून गेलं बाबा? इकडं एवढा जाळ होतोय अन हा कुठं जाऊन लपलाय काय माहित!"
मी एकदा हसत सांगितलं की इरावती कर्वे म्हणून एक लेखिका आहेत, त्यांनी एका लेखात विठ्ठलाला बॉयफ्रेंड म्हटलंय. खुदुखुदू हसायला लागल्या, म्हणे तुम्ही शिकलेल्या बाया येड्याच असता जरा, काहीही बोलता ...
मला आईंचा सूक्ष्म हेवा वाटतो पण; बुद्धीचा खडक फोडून निखळ भावनेचा झरा वहावा आणि हक्काने भांडता येईल असा विठ्ठल आपल्यालाही सापडावा, असं वाटत राहतं...

No comments:
Post a Comment