काल गुलजार यांच्या वाढदिवसामुळे रात्री आँधीमधल्या गाण्यांची उजळणी झाली, आणि आज मेमरीत मी शेअर केलेली सुधीर मोघे यांची ही कविता दिसली( कवितेच्या या शैलीला त्यांनी 'स्वगत-संवाद' हे सार्थ नाव दिलंय).
"इस मोड से जाते हैं," आणि
"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं", या दोन्हींच्या मधला टप्पा म्हणजे ही कविता आहे !
************
एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?
क्षणाभोवती
ही कसली रंगत खुलते आहे?
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू?
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे
तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदळणं हिताचं नाही
माझ्यापुरतं बोलायचं
तर मला माझी दिशाच नाही
तुझ्या संगतीत
आनंद आहे. आश्वासन आहे, दिलासा आहे.
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
भंगण्याचाच वसा आहे
म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून, चटका लावून,
निदान दूर होणं तरी असू नये
पण अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो.
- सुधीर मोघे
*****************
आपापल्या मार्गाने सुखनैव जाणाऱ्यांच्या वाटा अवचित एकमेकांना छेद देतात; आणि सगळे व्यवहारिक शहाणपण बाजूला ठेवत कुठल्या प्रेरणेने एक व्हायला बघतात...
पण शेवटी प्रवास असतो तो, थांबवता येत नसतो... आणि वाटांना उचलून हवे त्या दिशेला वळवता येत नाही. फार तर काही काळ एकत्र धावतात त्या; तशा आखलेल्या असतील तर...
तेही चांगलं की वाईट? कारण न भेटणं आणि भेटून हरवणं यातलं काय जास्त त्रासदायक, कोण जाणे...
प्रवासाची आणि वाटा न जुळण्याची अपरिहार्यता मान्य करून मग कुणी फैज
"यूँ न था, मैनें फ़कत चाहा था यूँ हो जाये," म्हणतो;
किंवा एखादा राजेंद्र कृष्ण
"न तुम बेवफा हो, ना हम बेवफा हैं
मगर क्या करें अपनी राहें जुदा है"
असा निवाडा करतो.
" इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहूँचती है", म्हणणारा गुलजारही नंतर " तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं" म्हणताना साथ हवी असेल तर मंजिल बदलावी लागेल हे मान्य करतो ....

No comments:
Post a Comment