दिलं एक मंदिर सिनेमातले 'रुक जा रात, ठहर जा रे चंदा', हे गाणं पहिल्यांदा ऐकले तेव्हाच खूप आवडले होते; त्यात एक उदास आर्त अंडरटोन होता जो मनाला खूप भिडणारा होता, ऐकता ऐकता डोळे पाणावले होते हे पक्के आठवते. पण प्रणयगीत असून इतके उदास का, याचे उत्तर नंतर काही काळाने चित्रपट पाहिला तेव्हा मिळाले.
नायकाचे दुसऱ्या दिवशी एक मोठे ऑपरेशन आहे, अगदी जीवन मरणाचा निर्णय त्यात होणार आहे. आजची रात्र कदाचित शेवटची ठरेल या भीतीचे सावट दोघांच्याही मनावर आहे.अशा मनस्थितीत नायक आपल्या पत्नीला म्हणतोय की लग्नाच्या पहिल्या रात्री तू मला जशी भेटली होतीस त्या नवविवाहितेच्या रुपात मला तुला परत एकदा बघायचे आहे. साजशृंगार करून अश्रू आवरत ती उभी आहे आणि त्यांच्या पहिल्या मिलनाची आठवण जागवणारे हे गाणं म्हणतीय... आणि आपल्या सर्वस्वावर बेतलेले जीवघेणे संकट तिच्या कातर स्वरातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतं.
****
आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना आपण बऱ्याचदा गृहीत धरलेले असते. आपले आई वडील, बहीण, भाऊ, हे सगळे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात, मात्र त्यांच्या भूमिकेचे महत्व आपल्याला तितके तीव्रतेने जाणवत नसते. पण त्यांचे जाणे, किंवा जाण्याची शक्यतासुद्धा आपल्याला समूळ हादरवून सोडते. It changes you in such a way you are never the same again ..
एक अवखळ, थोडा बेजबाबदार, थोडा खोडकर नवतरुण, आयुष्याला फार कॅज्युअली घेणारा; आपल्या मोठ्या भावाच्या समजूतदारपणाचा क्वचित गैरफायदाही घेणारा... एक वेळ अशी येते की मोठ्या भावाला गंभीर दुखापत होते आणि अपण नेमके काय गमावण्याचा उंबरठ्यावर उभे आहोत याची या तरुणाला प्रकर्षाने जाणीव होते. या प्रसंगात तो अमूलाग्र बदलतो. 'रुठके हमसे कभी, जब चले जाओगे तुम', हे गाणं म्हणजे त्याचा पश्चाताप, त्याची व्याकुळता, याचे मूर्त रूप. भाऊ बहीण या नात्यावर बरीच गाणी आहेत, त्या मानाने दोन भावांमधले भावनिक बंध इतके हळुवारपणे मांडणारे हे गाणे म्हणजे तसा दुर्मिळ प्रकार...
****
आपले नातेवाईक कोण असतील यावर आपला ताबा नसतो; मैत्री मात्र आपण स्वेच्छेने जोडलेले ऋणानुबंध... परस्परांचे गुण म्हणा अवगुण म्हणा, जुळले की मैत्री नावाची प्रचंड सुंदर गोष्ट आयुष्यात येते. त्यातही कॉलेज जीवनातली मैत्री अजून खास, कारण हवेतून जमिनीवर येण्याचा, स्वप्नातून सत्यात येण्याचा प्रवास आपण एकत्र करत असतो. उरात स्वप्नं आणि मनात आदर्शवाद घेऊन भराऱ्या मारणाऱ्या मित्रांचा बेसावध असताना चटका बसावा तसा दाहक वास्तवाशी, नकारात्मक कटुतेशी सामना होतो आणि तो ताण सहन न होऊन एक सवंगडी कोलमडतो, जीव द्यायचा प्रयत्न करतो. सगळं भावविश्व उध्वस्त झालेल्या त्याच्या मित्रांचा आकांत आणि त्याचबरोबर त्याला बरं करण्याचा निग्रह यांचं मिश्रण म्हणजे 'जाने नहीं देंगे तुझे..' हे थ्री इडियट्स मधलं गाणं... नुसतं ऐकतानाही हेलावून जायला होतं
****
माणूस एकटा येतो आणि एकटा जातो असे असले तरी जगत असताना तो नात्यांनी वेढलेला असतो.
काही नाती जन्माने बहाल केलेली तर काही स्वतः जोडलेली. यातली काही मोजकी नाती ही आपल्या जगण्याचा आधार असतात; प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी, कधी मनात हतबलता दाटून आली तर आश्वस्त करणारी, नव्याने उमेद जागवणारी...
पण नात्यांनाही मर्त्य असण्याचा शाप असतोच; त्यात मृत्यू हा चिरविरह घडवून आणणारा सगळ्यात मोठा खलनायक.
असा एखाद्या जीवलगाचा मृत्यू समोर उभा ठाकला; ज्याची सोबत सदैव गृहीत धरली तो हात कायमचा सुटण्याची शक्यता निर्माण झाली, की मन प्रचंड विकल होते.
आयुष्याचा जोडीदार, भाऊ, मित्र, या नात्यांचे बाह्यरुप वेगळे असले तरी त्या ऋणानुबंधांची आणि त्यामुळे त्या गाठी सुटण्याच्या भीतीने होणाऱ्या दुःखाची, त्या आर्त आकांताची जातकुळी मात्र एकच..

No comments:
Post a Comment