काल एका मैत्रिणीने एका गाण्यातून दुसरे गाणे आठवत जाण्याबद्दल लिहिलेले वाचले आणि मला बऱ्याच काळापासून एकत्र आठवणारी दोन गाणी आठवली.
मेहदी हसन यांनी गायलेली फ़राजची ' अब के हम बिछडे' ही गझल आणि लता मंगेशकर यांनी गायलेली सुरेश भट यांची 'मालवून टाक दीप' ही मराठी गझल.
दोन्ही गाण्यातले भाव अगदी वेगळे आहेत पण मला नेहमी एक ऐकलं की दुसरं आठवायचं. काल नेटवर शोध घेतल्यावर दोन्ही गाणी राग भुपेश्वरी (भूपश्री भूपकली) या रागात बांधलेली आहेत हे समजलं.

'मालवून टाक दीप' हे इरोटीक म्हणता येईल असं गाणं आहे. यात प्रदीर्घ विरहानंतर भेटलेला प्रियकर आहे, एकांत आहे आणि मिलनाची थेट मागणी करणारी धीट प्रणयिनी आहे.
यातलं प्रेम ताज्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखं रसरशीत आहे. यात आवाहन आहे, आळवणी आहे आणि लाभलेले क्षणांत त्याच्याशी पूर्णपणे समरस होण्याची लालसा आहे.
"हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?" हे विचारत ती एकमेकांत विलीन होण्याची, प्रेमात पूर्णपणे एकरूप होण्याची अपेक्षा करते आहे.
या गाण्याचे बोल शृंगारिक असले तरी चाल अशी आहे की गाणं गंभीर आहे असं वाटत राहतं 😊.
(होस्टेलला असताना मी लावलेलं हे गाणं ऐकून एक उत्तर भारतीय मैत्रीण म्हणाली होती शीतल ऐसे रोने धोनेवाले क्लासिकल गाने क्यों सुनती रहती है हमेशा... मग तिला शिस्तीत एक एक कडव्याचा नीट अर्थ सांगितला; तेव्हा डोळे विस्फारून "कैसे भयानक गाने सुनते हो रे बेशर्म लोग" म्हणून हसायला लागली.)

याच्या अगदी उलट 'अब के हम बिछडे' हे विरहगीत आहे.
मिलनाचा काळ संपून आता विरहाची चाहूल लागली आहे, आणि आता होणारी ताटातूट कायमची असणार याची जाणीवही आहे.
परत कधी भविष्यात भेट झालीच तर ती स्वप्नातल्यासारखी आभासी असणार आहे आणि तोवर प्रेमाचे फूल सुकून गेलेले असणार आहे.
पण यात विरहाच्या दुःखाकडे बघण्याचा एक तात्विक दृष्टिकोनही आहे . यातल्या प्रत्येक कडव्यात माणसाच्या बदलत जाणाऱ्या भावनांबद्दल एक इनसाईट आहे.
शेवटच्या "अब न वो मैं हूँ न तू है न वो माज़ी है "फ़राज़, जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें"
या ओळींमध्ये तर फराज नात्यांचे अशाश्वत असणे अधोरेखित करतो. तो म्हणतो,
"आता मी आधीसारखा नाही, तूही आधीची नाहीस, आणि आता तो काळही राहिला नाही; आपलं एकत्र येणं म्हणजे दोन व्यक्तींच्या आकांक्षांचे मृगजळ होते."
याचा एक वेगळा अर्थही लागतो... बिछडणे म्हणजे प्रत्यक्षात दूर जाणे असेही दरवेळी नसते; एकमेकांसोबत राहूनही माणसं बदलत जातात आणि मनाने एकमेकांपासून दूर जातात. मनांमध्ये हा कायमचा दुरावा आला तर मग एकत्र येणे हे निष्प्राण झालेल्या सुकलेल्या फुलांच्या निर्माल्यासारखे होऊन जाते.
या अँगलने वाचल्यावर सगळ्या गझलची नव्याने संगती लागते.

भुपेश्वरी हा नवीन राग आहे आणि यातली गाणी फार कमी आहेत; या रागात अजून एक गाजलेलं गाणं आहे..."चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली.
शारीरिक उत्कट अधीर प्रेमाच्या प्रकटनापासून ते प्रेम क्षणभंगुर असण्याबद्दलच्या प्रतिपादनापर्यंतचा प्रवास घडवणाऱ्या वरच्या दोन गाण्यांना या कव्वालीतला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा
सिद्धांत लावून पाहिला, तर हा नियम जगाप्रमाणेच नात्यांनाही लागू आहे असे म्हणता येते...

खूप छान लिहितेस शीतल तू...
ReplyDeleteब्लॉग साठी खूप साऱ्या शुभेच्छा..🌹🌹🌹
THANK YOU !
ReplyDelete