श्रीकृष्णाशी निगडित कुठलाही उत्सव आला की राधाकृष्ण रूप फार लोकप्रिय आहे हे जाणवते. साधारण आठव्या-नवव्या शतकात राधेचा कृष्णाचारित्रात प्रवेश झाला, आणि मधुराभक्तीने तिला अजरामर केले. पण खरंच ती संकल्पना आपल्याला कळली आहे, की आपापल्या सोयीसाठी आपण तिचे विकृतीकरण करतोय, अशी कधी कधी शंका येते.
अशा वेळी शांतपणे कुरुंदकरांचे 'व्यासांचे शिल्प' हाती घ्यायचे आणि त्यातल्या श्रीकृष्णावरच्या दोन प्रकारणांचे पारायण करायचे!
खरे तर ही दोन्ही प्रकरणे मुळातून वाचायला हवीत; पण त्यातले काही उतारे देण्याचा मोह आवरत नाहीय.
राधेच्या पलीकडचा एक कृष्ण आहे ज्याबद्दल कुरुंदकर म्हणतात,
" ऐतिहासिक कृष्ण धूर्त राजकारणी आहे, कर्तृत्ववान आहे. गणांचा नेता आहे, पराक्रमाने आपले राज्य बिनधोक करणारा आहे, शेजारी राष्ट्रांना मित्र करून शत्रूंचा नाश करणारा आहे. या कृष्णाची पूजा भारताने कधी केलीच नाही."
कृष्णाचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासातले महत्व त्यांनी फार सुंदरपणे उलगडून दाखवले आहे.
"श्रीकृष्णचरित्राविषयी बेजबाबदारपणे बोलायचे ठरले, तर पुष्कळ आहे, पण जबाबदारीने बोलायचे ठरवले तर काय बोलायचे, याच्याविषयी चिंता करण्यासारखे पुष्कळ पुष्कळ आहे. असे हे श्रीकृष्णाचे लोकविलक्षण चरित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे.
श्रीकृष्णाचे चरित्र भारतातल्या सर्व सांस्कृतिक जीवनाला जीवनाला आधारभूत म्हणून आहे. याचा अर्थ असा की, आमच्या नाटकांना, नृत्यांना, नानाविध चालीरीतींना आणि आपण ज्याला उत्तर भारतीय संगीत म्हणतो त्यातील अर्ध्या धृपदांना, ख्यालांना,ठुमरींना, कजरींना या जवळपास सर्व शास्त्रीय संगीताच्या संगीताच्या प्रकारांना श्रीकृष्णचरित्राचा आधार आहेत; तसेच भारतीय चित्रकलेचे मध्ययुगातले जे प्रमुख संप्रदाय आहेत, त्या प्रमुख संप्रदायांत तुम्ही पहाडी, कांगा, रजपूत व मुगल या इ. स. च्या चौदाव्या ते अठराव्या शतकापर्यंतच्या संप्रदायाची भारतीय चित्रकला शैली पाहिली, तर त्यातील मोगल शैली सोडून पहाडी, रजपुत, कांगा या तीन चित्रशैलीतील जवळजवळ दोन-तृतीयांश चित्रे कृष्णाचे चरित्राची जोडली गेली आहेत. तेव्हा संगीताला, चित्राला, काव्याला, नाटकाला, नृत्याला अशा सगळ्या भारताच्या सांस्कृतिक जीवनाला श्रीकृष्णचरित्र आधारभूत राहिलेले आहे. या श्रीकृष्णचरित्राचे वैशिष्ट्य असे की जीवन जेवढे गुंतागुंतीचे आहे तेवढे हे चरित्र गुंतागुंतीचे आहे आणि जीवन जेवढे विविध आहे, तेवढे ते चरित्र वैविध्याने नटलेले आहे. जीवनातले जे सगळे चांगले आहे, ते श्रीकृष्णचरित्रात समाविष्ट झालेले आहे. म्हणून जीवनातल्या सामग्र्याचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण परमात्मा या नात्याने श्रीकृष्ण आपल्या संस्कृतीमध्ये आहे, म्हणून ही जी श्रीकृष्ण नावाची 'पूर्ण परमात्म्याची' साथ आहे, ती आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, परंपरेचा आधार बनलेली आहे. त्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या सगळ्याच इतिहासामध्ये घडलेल्या आहेत असे समजण्याचे कारण नाही."
इतिहासातील असामान्य पुरुष हे सर्व कलांना, संस्कृतीला, तत्वज्ञानाला आधार कसे होतात हे पहायचे असेल तर कृष्णचरित्र अभ्यासायला हवे !
आणि राधा-कृष्णाचे प्रेम...त्यावरसुद्धा इतके सुंदर भाष्य त्यांनी केलंय!
" ज्या क्षणी राधा हे म्हणते की, "हे माझ्या प्रियकरा, तू माझ्याशी विवाह करावास, ही अपेक्षा नाही; नित्य सहवास लाभावा, हीही अपेक्षा नाही," त्या क्षणी हे प्रेम वासनेच्या पलीकडे निघून जाते! कारण सहवासाची, संरक्षणाची, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही; त्या प्रीतीत वासना वर्ज्यही नाही आणि वासना त्या प्रीतीचा आधारही नाही! ती वासनेच्या पलीकडे निघून गेलेली आहे. ही जी निरपेक्ष प्रीतीची कल्पना राधेच्या रूपाने आमच्या संस्कृतीने उभी केली आहे, ती जगातल्या वाङ्मयातल्या 'प्रेम' या कल्पनेचे सर्वात मधुर व उदात्त असे स्वरूप आहे."

No comments:
Post a Comment