'Searching' नावाचा एक सिनेमा आहे. त्यात आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या आणि त्यासाठी इंटरनेटवरून, सोशल मीडिया अकाउंटवरून धागेदोरे शोधणाऱ्या वडिलांची गोष्ट आहे. त्याचवेळी ही गोष्ट स्वतःच्या मुलीशी रोज चॅटिंगद्वारे संपर्कात असूनही तिच्या भावविश्वाची जाण नसलेल्या वडिलांचीही आहे.
आधी बहुधा माणसाचे इतके पर्सोना नसायचे. फार तर घरात एक, बाहेर समाजात वावरताना एक, अशी दोन व्यक्तित्व असतील.
आता प्रत्येकजण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय असं वाटण्याइतपत वेगवेगळ्या रुपात असतो. घरात आपल्याशी बोलणारी मुलं वेगळी; तीच मुलं इंस्टावर, इतर साईट्सवर असतात तेव्हा प्रचंड वेगळी असतात. त्यांचे कूल असण्याचे, थ्रिलचे कन्सेप्ट आपल्या आखीवरेखीव चौकटीला धक्का देणारे असतात. कधी फॉलोवर्स आणि फॉलोविंगच्या जंजाळात ती खूप एकटी, तर कधी खूप स्ट्रेस्ड असतात. एखादा मिशॅप झाला की मगच पालकांना आणि त्यानंतर आम्हा डॉक्टरांना माहिती होतं.
फक्त मुलंच असं नव्हे, जोडप्यांमधले विसंवादाचे, रादर असंवादाचे परिणाम अकल्पित स्वरूपात समोर येत आहेत.
निखळ शारीरिक व्याधींपेक्षा stress related disorders वाढले आहेत. हतबुद्ध व्हावे अशा समस्या घेऊन लोक येतायत.
एकदा टीव्ही पॅनलला वाळवी लागलेली पाहिली होती. सगळं नेटकं होतं फक्त एका ठिकाणी थोडं फुगल्यासारखं दिसलं; हात लावून पाहायला गेले तर भसकन बोट प्लायमध्ये गेलं आणि वाळवी बाहेर पडायला लागली.सगळा प्लाय पोखरून गेला होता, अक्षरशः भुसा झाला होता, पण बाहेरून अंदाजच आला नव्हता इतके दिवस.
माणसं सुद्धा कडेलोटाच्या टोकावर उभी असल्यासारखी झालीयत; वरून सगळं आलबेल दिसत असतं पण एका छोट्याश्या ट्रीगरने सगळी आवरणं गळून पडतात, आणि कोलमडून गेलेला विकल जीव डोळ्यासमोर असतो. आणि इतके दिवस आपल्याला यातलं काहीच कसं कळलं नाही?... ही जवळच्यांची प्रतिक्रिया आणि उद्वेग असतो.
अनेक संपर्कमाध्यमे हाताशी असण्याचा अभूतपूर्व काळ आहे हा. पण सगळेच संपर्क विसविशीत...जणू आधी घट्ट वीण असणारे धागे पसरवून विरळ केले आहेत. संख्यात्मक वाढ भरपूर आहे, पण हक्काने कुणी हाक मारावी, किंवा कुणाला हाक द्यावी, इतकाही अवकाश नसलेले प्रत्येकाचे स्वतंत्र सुटे खाजगी आयुष्य.
एरवी दृष्ट लागण्यासारखा दिसणारा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवरचा वावर असणारे अचानक असे काहीतरी दुखणे घेऊन येतात की स्वतःला निर्ढावलेलं समजत असणारं मन नव्याने चकित होतं. कुठे एखादा तरुण जीव स्वतःचा जीव घेतो, कुणी अन्व्हॉन्टेड प्रेग्नन्सी घेऊन येते, कधी अनेक वर्षे संसार केलेली जोडपी हिंसेची, वेगळं होणार असल्याची कहाणी घेऊन समोर बसलेली असतात.
आपण ज्यांना ओळखतो असं वाटतं, ती माणसंही किती अनोळखी असू शकतात हे लक्षात येतं.
संपर्कांचा परीघ मोठा होत जातोय तसे अंतरही वाढत चाललंय...