घराचे इंटेरियर होत होते तेव्हाची गोष्ट; सगळं उरकत आलं होतं आणि हॉलच्या भिंतीवर लावण्यासाठी चित्र निवडायची होती.
आमच्या डिझायनर मॅडमने एक चित्र सुचवलं; त्यात एकाच चित्राचे तीन भाग असतात आणि ते सलग न लावता थोडे अंतर ठेवून एका शेजारी एक लावायचे असतात म्हणे.
मला मात्र ती अर्धवट वाटणारी चित्र पाहून काही बरं वाटेना. म्हटलं बाई मला कळो न कळो पण रोज उठून पहावी तर मलाच लागणार! त्या दरम्यान माझ्याकडे एक कॅलेंडर आलं होतं आणि त्यातली पेंटिंग्स मला फार आवडली होती; मी तीच फ्रेम करून लावू असं सांगितलं. तिला मात्र काहीतरी कंटेम्पररी लावायचं होतं, मग आपण अजून एक वैकल्पिक सेट करू असं ठरलं. तर त्यात मी चार राजा रवीवर्मांची पोर्ट्रेटस निवडली... मग तिने शेवटी हात टेकले आणि तो विषय संपला!
मॉडर्न आर्टमधली माझी गती अगदीच शून्य आहे. आधुनिक चित्रकला बघण्याची, समजण्याची जी दृष्टी लागते ती माझ्याकडे नाही. रूढार्थाने सुंदर वाटणारी व्यक्तिचित्र, निसर्गचित्र पाहायला आवडतात.
परवा अहोंचे एक मित्र बऱ्याच वर्षांनी घरी आले. हॉलमधल्या चित्रांचं कौतुक केलं आणि ती मी निवडली म्हणून माझंही. कौतुक सुखावणारे होते, तरी त्यांना इमानदारीत सांगितलं की आवडली म्हणून लावली, त्यांबद्दल माहिती मात्र नाहीय. त्यांनी मग सांगितलं की ही प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार William-Adolphe Bouguereau यांची चित्र आहेत (अर्थात कॉपीज). चित्रकलेतल्या अकॅडेमिक शैलीचे ते प्रमुख चित्रकार होते; विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची लोकप्रियता ओसरली होती, पण आता परत नव्याने त्यांच्या चित्रांमध्ये लोकांची रुची वाढली आहे. त्यांनी हेही सांगितलं की राजा रविवर्मा देखील ही स्टाईल वापरत होते आणि त्यांच्या चित्रांवर या Bouguereau च्या अकॅडेमिक शैलीचा प्रभाव होता, असे संदर्भ उपलब्ध आहेत. हे ऐकून गंमत वाटली.
मला गाण्यांचे राग ओळखता येत नाहीत, पण आवडलेलं गाणं बहुतेक वेळा यमन रागातलं निघतं. तसं चित्रांच्या बाबतीत या अकॅडेमिक शैलीचे झाले होते बहुतेक!
यात लहानपणी पाहिलेल्या चित्रांचाही प्रभाव असेल. तेव्हा चित्र म्हणजे शक्यतो
देवांच्या तसबिरी असायच्या, ज्या सहसा राजा रविवर्माच्या चित्रांच्या कॉपी असायच्या, किंवा त्या शैलीशी मिळत्या जुळत्या असायच्या. आणि बहुतेक वेळा कॅलेंडर मधून चित्र कापून फ्रेम केलेले असायचे. ती चित्र बघायला फार आवडायची... लक्ष्मीच्या फोटोत मागे दूरवर धबधबा दिसायचा, तलाव आणि बदकं दिसायची, सोबत हत्तीही असायचे... अशा ठिकाणी जायला मिळायला हवे असे फार वाटायचे. महादेवाचे एक चित्र तर फार लक्षात आहे; फिकट रंगातला जटाओं में गंगा विराजित, मस्तक में चंद्र प्रकाशित रुपातला गळ्यात नाग आणि रुद्राक्षांच्या माळा ल्यालेला निळसर कांतीचा, कैलास मानसरोवरच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला शिवशंकर म्हणजे अद्भुताचा अविष्कार वाटायचा. तेव्हापासून मानसरोवर यात्रा करण्याचं स्वप्न मनात जाम खोल बसलंय.
अजून एक ठळक आठवण म्हणजे लकी नावाच्या एका हॉटेलच्या भिंतीवर रंगवलेली मोठीच्या मोठी चित्र. शाळेत जाताना मी त्या हॉटेलसमोर थबकून बाहेरून दिसेल तितकी चित्र वाकून वाकून बघत असे. नेहमी दिसणाऱ्या चित्रांपेक्षा फार वेगळी, रंगांची उधळण असलेली चित्र होती; त्यातली माणसंही वेगळी दिसणारी होती. वडिलांना सांगून त्यांच्यासोबत आत जावं आणि नीट सगळी चित्र पाहावीत, हे मात्र कसं कोण जाणे कधी सुचलं नाही. नुकतीच माहेरी गेले तेव्हा ठरवलं होतं आता नक्की बघू, पण तिकडे गेल्यावर कळलं आता ते हॉटेल राहिलं नाही आणि त्या भिंतीही...
गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मी, सरस्वती सापडल्या, महादेव मात्र भेटला नाही. ती हॉटेलातली चित्रही नव्हतीच, पण त्याबद्दलचा उल्लेख असणारा चित्रकार रविमुकुल यांचा एक फार सुंदर लेख वाचायला मिळाला.( लिंक पहिल्या कमेंटमध्ये) त्यांनाही या चित्रांची मोहिनी पडायची हे वाचून मौज वाटली.
किती गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यात रुजत असतात; आणि किती प्रकाराने आपल्या निवडींमध्ये रिफ्लेक्ट होतात! आणि ही सगळी लिंक शोधावी म्हटलं तर दरवेळी अखंड सापडेलच असेही नाही, पण ते एक्सप्लोर करण्यातही आनंद असतो; काही ना काही तर मिळूनच जातं...
न पहुंचा मंजिल तक तो क्या हुआ,
सफर अपने आप में कम हसीन नहीं होता...

No comments:
Post a Comment