गोवा ट्रिप म्हणजे फक्त समुद्र मासे आणि फेणी हा सर्वसाधारण समज. पण गोवा भेटीत फक्त समुद्रच नव्हे तर काही मंदिरांनाही भेट दिली. रेकमंडेशन चुकणार नाही याची खात्री होती. आणि एखाद्या पर्यटनस्थळाला गेलो की नेहमीचे गाजलेले स्पॉट्स सोडून थोडं तरी अंतरंग बघावं असं मला नेहमी वाटतं.
गोवा म्हणजे फक्त समुद्र हा समज दूर झाला.
शांतादुर्गा आणि महालसा नारायणी देवस्थान खूप चांगली राखलेली आणि मनःशांती देणारी आहेत. महालसा मंदिरातील दीपमाळ अतिशय सुंदर आहे. आणि तिथले जेवणही अस्सल कोकणी पद्धतीचे होते बहुतेक, चविष्ट होते अगदी.
अजून एक फारसं प्रसिद्ध नसलेलं ठिकाण म्हणजे तांबडी सुरला इथले महादेव मंदिर.
हे मंदिर गोव्यामधील सर्वात प्राचीन मंदिर आहे असे सांगितले जाते. वनराईत लपलेले हे देवालय अतिशय मनोरम आहे.
१३ व्या शतकात कदंब राजवटीच्या काळात याचे निर्माण झाले. बरेच आडबाजूला असल्यामुळे परकीय आक्रमकांच्या हल्ल्यांमधून सुरक्षित राहिलेले आहे. मंदिर बघताना ऐहोळे इथल्या मंदिरांची आठवण येते. गर्भगृहात शिवलिंग असून पूजा सुरू आहे; समोर नंदी आहे. मंदिराभोवती सुबक बाग आहे. हे स्थळ भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर एक ओढाही आहे.
एकूण परिसर फार serene आहे. गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे. तिथे जाणारा रस्ताही फार देखणा आणि बराचसा निर्मनुष्य आहे. घाटातून जाताना बऱ्याच ठिकाणी झाडांनी कमान केलेली आहे. त्या बऱ्यापैकी आडवळणी रस्त्यावरून जात सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या त्या मंदिर परिसरात विसावणे हा निव्वळ ट्रान्समध्ये नेणारा अनुभव आहे....

No comments:
Post a Comment