आठवणी हा प्रकार मती गुंग करणारा आहे. एखाद्या व्यक्तीशी निगडीत सुखद अनुभवांच्या स्मृती जागवून पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्याची कला माणसाला अवगत आहे. पण वर्तमानकाळात जर त्या व्यक्तीशी असलेले नाते बिनसलेले असेल, तर मात्र त्या आठवणी आनंददायी न राहता वेदनेचे कारण बनतात.
एका उत्कट नात्याचा दुःखद समारोप आणि म्हणून त्याच्याशी निगडित सर्व आठवणी पुसण्याचा प्रयत्न एका वैज्ञानिक प्रयोगामार्फत करणे, या थीमभोवती 'Eternal sunshine of the spotless mind' या चित्रपटाची कथा फिरते.
हा चित्रपट प्रेमकथा, विज्ञानकथा, थ्रिलर अशा बऱ्याच वर्गांत मोडतो. नॅरेटिव्ह नॉन लिनियर पद्धतीने उलगडते त्यामुळे लक्ष देऊन पाहायला लागते. पण सिनेमा गुंगवून टाकणारा आहे.
नात्याचा अंत झाला म्हणून त्यातल्या सुखद क्षणांचे मोल नष्ट होते का? पूर्वाश्रमीच्या नात्याची आठवण शिल्लक नसतानाही ती व्यक्ती नव्याने भेटल्यावर परत तशीच ओढ का लागते? दुसरी संधी मिळाली, तर पुन्हा त्याच वाटेने जायला नको असे वाटणे योग्य, की त्या चुका टाळून, समोरच्याला स्वीकारून परत एकदा त्या ओढीला शरण जाणं योग्य? अशा प्रश्नांचा वेध हा चित्रपट घेतो.
चित्रपटाचे शीर्षक म्हणून अलेक्झांडर पोप या कवीच्या Eloisa to Abelard या पत्राच्या स्वरूपात असलेल्या कवितेतल्या ओळी वापरल्या आहेत...
“How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!
Each prayer accepted, and each wish resigned.”
ही कविता बाराव्या शतकातील एका विवादास्पद प्रेमकथेवर आणि त्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित आहे. यातली नायिका आता ननचे आयुष्य कंठते आहे, आणि भूतकाळातील सर्व आठवणींचे डाग पुसून आता निर्विकार शांततेच्या निरंतर प्रकाशात आनंदी असल्याचे सांगत आहे.
लौकिक जगात मनात उमटणारे विकार, स्मृती या सगळ्यांना अव्हेरून निष्कलंक अशा परलौकीक आनंदात रममाण होणे, हे एक प्रकारे 'विस्मृती हेच वरदान' चे अध्यात्मिक स्वरूप आहे.
गंमत म्हणजे चित्रपट याच्या उलट सुचवू पाहतो. प्रयत्न करूनही नायक नायिका एकमेकांना आपल्या मनातून पूर्णपणे पुसून टाकू शकत नाहीत आणि एका अगम्य ओढीने दोघेही परत एक विशिष्ट ठिकाणी येतात, परत भेटतात आणि आपल्या नात्याला अजून एक संधी देण्याचे ठरवतात.
एखाद्या नात्यात गोष्टी मनाविरुद्ध घडल्यामुळे होणारा त्रास नको म्हणून आयुष्यातल्या अनुभवांना, स्मृतींना दूर सारणे; किंवा मग नात्यांतले कडूगोड दोन्ही स्वीकारत त्या डागांसकट आयुष्य अनुभवत राहणे, यातले द्वंद्व दाखवून चित्रपट दुसऱ्या पर्यायाचा बाजूने कौल देतो.
मुळात सगळ्या प्रेरणा बुद्धीच्या कक्षेत पूर्णपणे आणणे; हव्या तशा, हव्या तेव्हा इनिशिएट करणे किंवा संपवणे मानवी प्रज्ञेला शक्य आहे का? हा प्रश्नही सिनेमा पाहताना उपस्थित होतो. आणि आपलं असणं, याचा बराच भाग आपल्या अनुभूतींनी व्यापलेला असेल, तर त्यांपासून दूर जाऊन काय हाशील; त्यापेक्षा सगळ्या बॅगेज सकट स्वतःला आणि समोरच्याला स्वीकारणं जास्त संयुक्तिक नाही का?
(नेहमी धबधब्यासारख्या फसफसणाऱ्या जिम कॅरीला संयत रुपात बघणं आणि केट विन्सलेटला बेफाम भूमिकेत पाहणं, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे... थोडक्यात सांगायचं तर हे एकाच वेळी विश्वसनीय आणि सर्रियल असा काहीतरी अनुभव देतात.)

No comments:
Post a Comment