Saturday, 30 November 2019

सार्थ- नावे आणि गावे


'सार्थ' नावाची एस. एल. भैरप्पांची एक कादंबरी आहे. यात कथानायक एका सार्थ(तांडा) सोबत मध्य भारतातील त्याच्या गावाकडून उत्तरेकडे प्रवासाला निघतो आणि अनेक अकल्पित वळणे घेऊन त्याचा प्रवास आणि तो, दोन्ही एका टप्प्यावर येऊन स्थिरावतात, असे साधारण कथानक आहे.

 ही कथा आठव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर घडते. त्या अनुषंगाने तात्कालिक भारतातील स्थित्यंतरे, विचारप्रवाह, राजकारण, समाजजीवन, रूढी आणि धार्मिक आचार-विचार यांचे खूप समर्पक आणि अभ्यासू चित्रण कादंबरीत आहे .
कथेत काही ऐतिहासिक व्यक्तिरेखांचाही समावेश आहे. तसेच त्या काळातील मुख्य प्रवासमार्गांचे वर्णन असून बऱ्याच खऱ्या नगरांचा उल्लेख आहे, ज्यांची नावे मात्र त्या काळात प्रचलित असलेली आहेत.

 त्या गावांची आजची नावे शोधायला मजा आली.

माहिष्मती: मध्य भारतातील एका छोट्या राज्याची राजधानी . आताचे महेश्वर (म.प्र).
उज्जयनी : मध्य भारतातील एक महत्वाचे राजधानीचे शहर. आजचे उज्जैन .
प्रतिष्ठान: सातवाहनांची राजधानी. आताचे पैठण .
पाटलीपुत्र: प्राचीन भारतातील एक अतिशय महत्वाचे शहर; मौर्य, गुप्त साम्राज्यांची राजधानी. आताचे पटना (बिहार).
कन्याकुब्ज: उत्तर भारतातील एक महत्वाचे राजनैतिक आणि व्यापारी केंद्र. आताचे कनोज (उ.प्र).
अहिछत्र: उत्तर पंचालची राजधानी . आताचे  अहीक्षेत्र, बरेली जवळ(उ.प्र)
कोसंबी: प्राचीन उत्तर भारतातील एक नगर. आताचे कौशंबी, अलाहाबाद जवळ(उ.प्र).
कांपिल्य: दक्षिण पंचालची राजधानी. आताचे कंपिल गाव.(उ.प्र).
ताम्रलिप्ती : बंगालच्या खाडीजवळ असलेले प्राचीन भारतातील एक महत्वाचे बंदर व व्यापारी केंद्र. आताचे तामलुक (पश्चिम बंगाल).
तक्षशिला: प्राचीन वायव्य भारतातील एक महत्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यापारी केंद्र. आताचे तक्सीला , रावळपिंडीजवळ (पाकिस्तान).
पुष्कलावती: प्राचीन गांधार राज्याची राजधानी.
आजचे चारसद्दा, पेशावरजवळ (पाकिस्तान).
मूलस्थान: प्राचीन वायव्य भारतातील सुर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असणारे एक नगर.
आताचे मुलतान, पंजाब (पाकिस्तान).
सिंहल देश: श्रीलंका.
सुवर्णद्वीप: सुमात्रा.

काही गावांचा मात्र शोध लागला नाही :
घरकच्छ (मध्य भारत).
रोहितगिरी (उत्तर भारत).
त्रिविष्णू प्रदेश (उत्तर भारत).

No comments:

Post a Comment