शाळेत असताना एक गोष्ट वाचली होती. एक कट्टर विष्णुभक्त असतो; इतका कट्टर की तोंडाने शंकराचे नावही घेत नाही, चुकूनही महादेवच्या मंदिरात जात नाही. विष्णू हाच सर्वश्रेष्ठ देव असे मानत असतो आणि शिवभक्तांचा द्वेष करत असतो.
तिकडे देवलोकात महादेव आणि विष्णूला हे पाहून दुःख होतं. ते ठरवतात की भक्ताला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की सगळ्या देवांमध्ये एकच तत्व वसते; कुठलाही देव सारखाच, त्यामध्ये भेदभाव करू नये.
मग तो भक्त जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा त्याला मूर्तीच्या ऐवजी शंकराची पिंड दिसायला लागते. तो हादरून जातो, परत परत विष्णूचे स्मरण करू लागतो, पण काही उपयोग होत नाही; डोळे उघडले की पिंडीचे दर्शन! अगदी रडकुंडीला येऊन गयावया करत म्हणतो देवा हे काय पाप माझ्या हातून घडत आहे? तितक्यात विष्णू प्रकट होतात आणि म्हणतात की वत्सा आम्ही सगळे एकच आहोत, तू भेदभाव न करता सगळ्या देवांना सारखंच समज. मग भक्ताला आपली चूक लक्षात येते, आणि सगळे देव सारखे, हे त्याला पटते.
कलियुगात मंदिरांची संख्या खूप वाढली; देव बिजी होत गेले. मग त्यांनी भक्तांमध्ये सर्वदेवसमभाव जोपासण्याचे कार्य आऊटसोर्स करून प्रगतीशील महाराष्ट्राच्या नेत्यांकडे सुपूर्द केले....

No comments:
Post a Comment