आजच्या दिवशी "गोड गोड बोला" हे सहज, फार विचार न करता औपचारिकता म्हणून म्हटले जाणारे शब्द.
जन्मानंतर भोवतालच्या माणसांशी व्यक्तीचा पहिला स्पष्ट संपर्क घडतो तो गोड बोबड्या बोलांतून. आणि तिथून आयुष्यभर वापरात येणाऱ्या भाषा नावाच्या सनातन संपर्क माध्यमाचे त्याचे शिक्षण सुरू होते.
भाषेच्या माध्यमातून आपल्याच नव्हे तर आपल्या मागील पिढ्यांच्याही अनुभवांचे संचित आपल्या प्रजातीच्या इतर सदस्यांना हस्तांतरित करता येत असल्यामुळे मनुष्याची शहाणीव तो प्रत्यक्ष जगत असलेल्या आयुष्यापेक्षा जास्त असते, आणि पिढी दर पिढी हा संग्रह वाढत जातो.
या सगळ्या इनपुट्स मुळे मनात उमटणाऱ्या विचारांची, भावनांची देवाण घेवाण करणे, संवाद साधणे, हे बोलणे या क्रियेमागचा मुख्य उद्देश्य.
पण सगळ्यात विपुल प्रमाणात वापरले जाणारे आणि जवळजवळ प्रत्येकाला ज्ञात असलेले हे माध्यम फारसा विचार न करता वापरले जाते. स्वस्ताई असली की वापर बेबंद होतो😊.
आपल्या हाताशी असणाऱ्या साधनाचे शस्त्र कधी होते कळत नाही आणि एकदा हे सुरू झाले की बोलण्याचा प्राथमिक उपयोग बाजूला पडतो.
अशा स्थितीत आजच्या मुहूर्तावरचे "गोड बोला" हे रिमाइंडर... गोड बोलणे म्हणजे फक्त तोंड देखलेपणा किंवा खोटी स्तुती नव्हे; त्यात मृदू बोलणे, निर्विष बोलणे, विचार किंवा मत व्यक्त करताना अनावश्यक विखार टाळणे, हेही समाविष्ट असावे.. असे हे संक्रमण तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात होवो ...🙂
" बोली एक अनमोल है, जो कोई बोलै जानि।
हिये तराजू तौलि के, तब मुख बाहर आनि।। "
-- कबीर

No comments:
Post a Comment