मी पहिल्यांदा पुण्यात राहिले ते दहावीच्या सुट्टीत, NTSE परीक्षेच्या दुसऱ्या फेरीचे क्लासेस करण्यासाठी; त्यावेळी लातूर जिल्ह्यात अशी सोय कुठे नव्हती, किंबहुना ही परीक्षाच फारशी कुणाला माहीत नव्हती.
आपल्या ठराविक सुरक्षित परिघाबाहेर जाऊन राहण्याची ही पहिलीच वेळ. बाहेरच्या जगाचा फारसा अंदाज नव्हता, आणि इथे मात्र पूर्ण वेगळं असं जग समोर होतं.
मला पुणं माहीत आहे म्हणजे पुण्यातल्यांनाही माझं गाव माहीत असेल हा भ्रम लगेच दूर झाला...उदगीर? कर्नाटकात आहे का? विदर्भ का? असे प्रश्न ऐकले की विचित्र वाटायचं.. मग मी लातूर सांगायला लागले(अजूनही लातूरच सांगितलं जातं). त्यानेही किरकोळच फरक पडला.
भाषेच्या बाबतीतही असंच व्हायचं; बोलण्यात तो एक विशिष्ट हेल यायचा,(अजूनही येतो थोडा, पण आता कुणी तोंडावर हसत नाही..) आणि कुणी पुसटसं हसलं तरी बोलण्याचा कॉन्फिडन्स जायचा. तसं फार कुणी बोलायचंही नाही, आपण बोलायला गेलो तरी प्रतिसाद थंड असायचा, hostility जाणवायची.
वर्गाला जायचं म्हणजे संकट वाटू लागलं. सगळे स्मार्ट, कॉन्फिडन्ट, स्टायलिश कपडे घालणारे, कॉन्व्हेंटची इंग्लिश आणि पुणेरी मराठी बोलणारे; त्या सगळ्यात आपण फार गावंढळ आहोत असं वाटायचं.
मागासलेल्या भागातून आलेलं असणं म्हणजे नेमकं काय असतं याची जाणीव झाली.
मग एक quiz झाला वर्गात.. पाहिल्या दोन तीन प्रश्नांची उत्तरे येत असून मी संकोचामुळे दिली नाहीत. नंतर मात्र हिम्मत करून बोलायला सुरुवात केली आणि बरीचशी अचूक उत्तरे दिली. गंमत अशी झाली होती की quiz सोशल सायन्सेस वर होता, आणि ही मुलं विज्ञानात सराईत असली तरी इतिहास भूगोलकडे कमी लक्ष देणारी होती.
विज्ञान, गणित महत्वाचं म्हणून फक्त त्यावर फोकस करायचं आणि सोशल सायन्स, भाषा विषय थोडं दुर्लक्षित केलं तरी चालेल, असा भेदभाव करणारी स्मार्ट शाळा नव्हती आमची. त्यात गणित, विज्ञान यापेक्षा इतिहास, भूगोल, भाषा, हे विषय माझ्या कणभर जास्त आवडीचे, त्यामुळे त्या विषयात थोडी गती होती. त्या दिवसापासून बाकी विद्यार्थ्यांचा अप्रोच थोडा बदलला. काहीजण तरी ओळख दाखवू लागले, बोलू लागले.
पण पुढेही हे कायम जाणवत राहिलं की आपण सहिष्णू आणि समावेशक नाही आहोत.
बऱ्याचदा आपल्यापेक्षा वेगळं काही समोर आलं की आपली पहिली प्रतिक्रिया तुच्छतेची आणि उदासीनतेची असते; आपण सहज स्वीकार करतच नाही .
साधं घरातदेखील सासूला सुनेच्या माहेरच्या रूढी चूक वाटतात, सुनेला मात्र त्यांचा जाज्वल्य अभिमान... 'आमच्याकडे असं नव्हतं', आणि 'आपल्याकडे हे असलं काही चालत नाही', यात कितीतरी वर्ष वाया जातात.
शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांना सिनेसंगीत फालतू वाटतं, सिनेसंगीत प्रेमींना शास्त्रीय संगीत बिनकामाचं पाल्हाळीक वाटतं. इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांना मराठीतलं लिखाण तुच्छ वाटतं. आधुनिक वेशभूषा आवडणाऱ्यांना पारंपरिक कपडे घालणारे गबाळे वाटतात; उलटपक्षी यांना ते छिचोर वाटतात.... यादी न संपणारी आहे.
एखादी गोष्ट आपल्या मान्यतांपेक्षा चांगली किंवा वाईट आहे, असे मूल्यन न करता फक्त वेगळी आहे, अशी भूमिका ठेवणं आणि त्याबद्दल जजमेंटल न होणं आपल्याला इतकं का जड व्हावं ...

No comments:
Post a Comment