#रंजिश ही सही...
कुठल्याही नात्याचा डाव दोघे मिळून मांडतात, ... त्या क्षणी दोघे एका प्रतलावर एका रेषेत असतात.
नंतर मात्र दोघे एकाच दिशेला जातील असे नाही; आपल्या सवंगड्याचे न जाणवलेले कांगोरे टोकदार भासू लागतात, दुसरा एखादा डाव खुणावू लागतो, कधी या सगळ्या खेळाचाच कंटाळा येऊ लागतो...
आणि मग एकजण मनाने आणि पाठोपाठ शरीरानेही यातून बाहेर पडतो. दुसरा सवंगडी मात्र अजूनही या डावात आकंठ बुडालेला...
पण याने कितीही एकतर्फी धडपड केली तरी ती व्यर्थ ठरते; डाव मोडतो, सोबतीचा दिवस मावळतो.
यानंतर सुरू होते ती आशेचे दीप लावून गेलेला दिवस परत आणण्याची वृथा कसरत...
कधी प्रेमाचे, कधी जगाचे दाखले दिले जातात, आर्जवे केली जातात.
पण हळूहळू रात्र वाढत जाते, अंधार गहिरा होत जातो; आस मावळू लागते, वाट पाहण्यातला फोलपणा कळू लागतो .
पण मन एकीकडे इतकं हतबल आणि दुसरीकडे इतकं चिवट, की वस्तुस्थितीचा स्वीकार करून हार मानत असतानाही शेवटी हा आशेचा दीप विझवण्यासाठी तरी ये, अशी शेवटची साद घालतंच...

No comments:
Post a Comment