अभिनेता इरफान खानचे त्याच्या आजारपणाविषयीचे पत्र वाचले आणि परत एकदा जाणवले, 'Life is what happens to you when you are busy making other plans.'
त्याने आयुष्याची अनिश्चितता आणि वेदना यावर सुरेख लिहीले आहे.
आयुष्यात आपण पळत असतो, कितीतरी स्वप्न, इच्छा उराशी कवटाळून , आणि कधीतरी अचानक अनपेक्षितपणे तो क्षण येतो, जिथे तुमच्या हातात काहीच नसतं... You are absolutely helpless. फक्त मृत्यूच असं नाही, पण इतर स्वरूपातही dead ends येतात. फरक इतकाच की ते मृत्यूइतके 100% अपरिवर्तनीय नसतात.
त्याने वेदनेबद्दलही अगदी तंतोतंत लिहिले आहे; तीव्र वेदना पूर्णपणे वेढून टाकते, अक्षरशः गिळंकृत करते.
पण तो अत्यंतिक वेदनेचा, दुःखाचा क्षण साक्षात्कारी असतो. तो अनुभवला, की वैयक्तीक लागेबांधे सुटून आपण आपल्या भूमिकेतून बाहेर येतो आणि साक्षीभावाने आयुष्याकडे बघतो. तेव्हा जाणवतं, समजतं, की अनिश्चित, अनाकलनीय, क्षणभंगुर असले तरीही आयुष्य प्रचंड अद्भुत आहे, सुंदर आहे, भारावून टाकणारं आहे.
आयुष्याचे हे विश्वरूप दर्शन झाले, की अत्यंत प्रतिकूलतेतही माणसाची जिजीविषा का टिकून राहते, याचं कारण लक्षात येतं. अतिशय असह्य परिस्थितीतही जगण्याची उमेद टिकून राहते ती या आयुष्याच्या गारुडामुळे ...
आणि मग स्वतःचा भोवताल उध्वस्त झालेला असतानाही आपल्या मुलाचे भावविश्व करपू नये म्हणून धडपडणारा Life Is Beautiful मधला Guido नव्याने कळायला लागतो ...

No comments:
Post a Comment