'द हॉबिट' या चित्रत्रयीतल्या तिसऱ्या चित्रपटात एक फार सुंदर सीन आहे.
थोरिन हा राजा त्याच्या वाडवडिलांचे गमावलेले पर्वतावरचे राज्य परत मिळवतो, आणि त्या पर्वतात असलेल्या प्रचंड संपत्तीचा मालक होतो. ते अपरंपार सोने बघून सगळी तत्व, उमदेपणा विसरतो आणि जवळजवळ वेडाच्या पातळीपर्यंत मोह त्याला झपाटतो. इतक्या प्रचंड संपत्तीचा मालक होऊनही तो अशांत असतो कारण अर्केंस्टोन नावाचे एक खूप मौल्यवान रत्न त्याला सापडत नसते. तो स्वतःच्या निष्ठावान साथीदारांवर संशय घेऊ लागतो. बिल्बो या विश्वासू सवंगड्यालाही तो संशयापोटी मुठीत काय आहे हे विचारतो तेव्हा बिल्बो आपली मूठ उघडून त्याला प्रवासात मिळालेल्या आणि जतन करून ठेवलेल्या दोन बिया दाखवतो आणि सांगतो की त्याने त्या बिया घरी नेण्यासाठी जपून ठेवल्या आहेत. थोरिन त्याला हसून विचारतो इतकी क्षुल्लक वस्तू तो परत घरापर्यंत का सांभाळून नेतोय .
त्यावर बिल्बो म्हणतो त्या बिया मी स्वतःच्या घरी नेऊन माझ्या अंगणात पेरणार, त्यांचे वृक्ष होणार आणि त्यांच्याकडे पाहून मला चांगला-वाईट गोष्टींनी भरलेला हा सगळा प्रवास आठवणार; आणि हा सगळा रोमहर्षक प्रवास पार पाडून मी सुखरूप घरी परत येऊ शकलो ही किती मोठी सुदैवाची गोष्ट आहे, हे माझ्या स्मरणात कायम राहणार...
त्यावर एखादी महत्वाची पण विस्मरणात गेलेली गोष्ट लक्षात आल्यासारखं एक खूप सुरेख, निखळ हास्य थोरिनच्या चेहऱ्यावर उमलतं, त्याचा चेहरा परत आधीच्या थोरिनसारखा दिसायला लागतो आणि क्षणभर आपल्यालाही वाटतं त्याचा सुवर्ण ज्वर आता उतरला...
आयुष्य फार मजेशीर आहे ...आपल्या सुखाच्या कल्पना वाढल्या की दुःख वाढत जातं 😊... जे मिळालं ते गृहीत धरल्या जातं आणि अजून काहीतरी मिळवण्याची धडपड सुरू राहते . साधने आपल्यासाठी की आपण साधनांसाठी हेच कळेनासं होतं...
साध्या सोप्या दैनंदिन बेसिक गोष्टींत आनंद मानणारा बिल्बो सगळ्यांच्या मनात असतो. पण कधीकधी आपणच अंगावर घेतलेल्या अनावश्यक ओझ्यांखाली पार गुदमरून जातो... त्याला जागृत आणि सक्रिय ठेऊ शकलो तर आयुष्य इतकंही कठीण नाही...😊

No comments:
Post a Comment