व्यावसायिक क्षेत्रात unlearning या संकल्पनेला खूप महत्व आले आहे.
शिक्षण, व्यावसायिक अनुभव यांतून आपण काही बिझनेस मॉडेल्स, व्यावसायिक धोरणे आत्मसात करतो. पण काळाच्या ओघात ही outdated होत जातात. अशावेळी हे जुने ठोकताळे विसरणे, जेणेकरून अद्ययावत असलेली नवी मॉडेल्स, नवी धोरणे अंगीकारता येतील... याला unlearning म्हणतात.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात ही हे खूप उपयुक्त आहे.
वय वाढत जाते तसे आपल्याला आलेल्या सगळ्या अनुभवांची डोक्यात एक archive बनते ,..जणू एक मोठ्ठा संदर्भग्रंथच तयार होतो.
वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना अनुभवताना पूर्वीचे हे संदर्भ डोक्यात गर्दी करू लागतात; आणि बहुतांश वेळा हे निगेटिव्ह संदर्भ असतात.
उदा:आपल्या घरात एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाला, की आपल्याला त्या त्रासामुळे झालेले मृत्यू आठवतात; बरे झालेले रुग्ण नाही. कारण सगळ्या सुरळीत, व्यवस्थित घडलेल्या गोष्टी आठवणीत राहत नाहीत; पण वेगळं, दुर्दैवी काही घडलेले मात्र जास्त memorable असते आणि स्मृतीत जास्त राहते .
या सततच्या बॅकग्राउंड रेफेरेन्सस मुळे आपली दृष्टी निर्लेप राहत नाही. आपल्या जगण्यावर पूर्वानुभवाची पुटं चढत जातात. नवीन अनुभव घेताना मागच्या आठवणी कटू असतील तर तो अनुभव नाकारणे, किंवा ते अशक्य असेल तर भीती, निराशा अशा नकारात्मक भावना घेऊन त्या प्रसंगाला सामोरं जाणे, अशा गोष्टी घडतात .
आणि क्वचित सुखद आठवणी असल्या की सद्य प्रसंगाची त्यांच्याशी तुलना करून आनंदाची प्रतवारी ठरवली जाते.
निखळ अशी अनुभूती अशक्य होऊन बसते.
व्यक्ती, परिस्थिती, जीवनशैली, सामाजिक आचरण, इतकेच काय चांगल्या-वाईटाच्या संकल्पना, यांत कालानुरूप बदल होत असतात; पण आपण भूतकाळातले चष्मे लावले की दृष्टी निकोप राहत नाही आणि हे बदल उमजत नाहीत, किंवा मनापासून स्वीकारले जात नाहीत ..
म्हणून थोडे unlearning करावे; निखळ मनाने अनुभवांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करावा.
डोळस नक्कीच असावे, पण पूर्वानुभवातून आलेले शहाणपण, हे वर्तमानातील अनुभूतीच्या मार्गातील अडसर ठरू नये .

No comments:
Post a Comment