Saturday, 30 November 2019

ऐक ना जरा

माणसाला जे दिसतं, जाणवतं, समजतं;  त्याच्या मनात ज्या भावना, विचार येतात;.... इतकंच नव्हे, तर तो जे कल्पनेत रंगवतो,  ते सगळं त्याला आपल्यासारख्या कुणापर्यंत तरी पोहोचवायचं असतं. या अभिव्यक्तीचा उर्मीतूनच भाषेसारखी संपर्कसाधने परिष्कृत होत जातात.
 साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, चलचित्र, असे अनेक कलाविष्कारही यातूनच जन्माला आले असावेत. आज सोशल मीडिया इतका लोकप्रिय आहे त्याच्या मुळाशीही हीच उर्मी आहे .
आपली जी भावनिक गुंतवणूक किंवा अवलंबित्व असते, तिचा गाभासुद्धा संवादाची गरज आणि तिची पूर्ती, याने व्यापलेला असतो. आणि गंमत म्हणजे आपण संवाद म्हणत असलो तरी आपल्याला मूलतः श्रोता, recepient हवा असतो...
माणसाचे आयुष्य म्हणजे अशा समानशील श्रोत्यांच्या शोधाचा प्रवास  असावा....




No comments:

Post a Comment