बऱ्याचशा रूढी, परंपरा आपल्या नकळत आपल्या जगण्याचा भाग झालेल्या असतात, कारण लहानपणापासून आपण त्यात भाग घेत असतो.
वय वाढते तसे आपल्या वैयक्तिक ज्ञानकक्षा, अनुभवविश्व विस्तारत जाते, त्यातून कधी आपल्या धारणा बदलत जातात, कधी आपण एखादी नवीन विचारधारा स्वीकारतो. मग मूळ कुटुंबात असणाऱ्या काही प्रथा आपण बंद करतो, कधी काही नव्याने सुरू करतो.
हे असे प्रत्येकाच्या बाबतीत होते असे नाही.
कधी पुढची पिढी अजिबात बदलत नाही, कधी अंशतः बदलते, तर कधी अमूलाग्र बदलते. आणि वैयक्तिक पातळीवर बदल घडले तरी सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत हे अजून गुंतागुंतीचे होते.
त्यामुळे आपल्याकडे एकाचवेळी कर्मकांडांच्या निरनिराळ्या टप्प्यांवर उभे असलेले समूह, आणि व्यक्ती दिसतात.
यातल्या ज्या गोष्टी आपल्या समता, स्वातंत्र्य या मूलभूत संकल्पनांच्या दृष्टीने घातक आहेत, त्या आटोक्यात आणण्यात आपल्याला काही प्रमाणात यश आलेलं आहे, आणि त्या दिशेने पाऊले टाकायला हवीत याबद्दल सर्वसाधारण सहमती आहे .
काही प्रथा, उत्सव हे अन्यायकारक नसले तरी थोडया काळापुरते का होईना सार्वजनिक जीवन विस्कळीत करणारे/ manhours चा अपव्यव करणारे/ प्रदूषण वाढवणारे/ सार्वजनिक स्वच्छता बिघडवणारे/ सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढवणारे आहेत.
पण त्याचवेळी शतकानुशतके सुरू असलेले हे उत्सव सांस्कृतिक वारसा जपणारे, लोकांना एकत्र जोडणारे, सश्रद्ध लोकांच्या हृदयाशी जवळीक साधणारे, त्यांच्या भावविश्वाचा अभिन्न भाग असणारे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारे आहेत.
देश मोठा, समाज बहुरंगी, त्यामुळे अशा उत्सवांची संख्याही भरपूर.
त्यात परत देवांशी निगडित आणि महापुरुषांशी निगडित असे उपविभाग आणि त्यांच्याशी जोडलेल्या अस्मिता आहेत.
या धार्मिक, सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत आपली पसंती-नापसंती आणि त्याची तीव्रता, ही बऱ्याचदा विसंगत, सिलेक्टिव्ह आणि परस्पर विरोधी असते, आणि त्यावर आपल्या वैयक्तिक श्रद्धांचाही प्रभाव असतो . यातून मग आपला तो बाब्या असा पक्षपाती दृष्टिकोन तयार होतो.
आपले एकजिनसी नसणे, आणि म्हणून आपले सार्वजनिक जीवन आधुनिक जगाच्या विशिष्ट सामायिक नियमांमध्ये बांधता न येणे, हे त्यामुळे अपरिहार्य आहे !

No comments:
Post a Comment