Saturday, 30 November 2019

दुसरी बाजू

कोशिश सिनेमात एक सीन आहे.
 त्यातले दाम्पत्य मूकबधिर असते. त्यांना मूल होते तेव्हा ते नॉर्मल आहे की नाही याची त्यांना खूप काळजी वाटत असते. मग ते एक खुळखुळा वाजवून मुलाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मूल प्रतिसाद देत नाही तेव्हा घाबरून डॉक्टरांना बोलवून आणतात; कारण त्यांची खात्री होते की  मूल बहिरे आहे. नंतर डॉक्टरांनी दाखवल्यावर त्यांना कळतं की खुळखुळाच रिकामा असतो, बाळाच्या ऐकण्यात काहीही दोष नसतो .
एकाच बाजूने विचार करत राहिलो, एकच समजूत मनात घट्ट धरून राहिलो, की निष्कर्ष असे दिशाभूल करणारे निष्कर्ष निघतात  .
मजा आली😊😊...
स्वसंवाद ही एक secure फेज असते, विशुद्ध सुद्धा; परिपूर्णतेच्या दृष्टीने तिचा success rate ही जास्त असतो. त्यातला drawback असा, की स्वतःचा कसलाच say न ठेवता निखळ ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते, जी इतरांशी संवाद साधण्यासाठी फार आवश्यक असते.
 पर-संवादासाठी थोडं ढोबळ असावं लागतं; (दागिना बनवताना शुद्ध सोन्यात थोडी भेसळ करतात तसं काहीतरी...)
तंतोतंत wavelength जुळणं किंवा 100% आकलन शक्य नसतं...Input च्या तुलनेत output कमी असतो; त्या अर्थाने संवादाचा success rate कमी असतो. संवाद हा समजण्याचे, समजून घेण्याचे तुकडे जोडतच सुरू ठेवावा लागतो ...पण त्याचं उत्तर स्वसंवाद आहे असं वाटत नाही . पर-संवाद असावा, तो व्यक्तीगणिक qualitatively आणि quantitatively बदलत असला तरीही ..
कारण इतरांशी संवाद साधण्यात मजा आहे, ते आव्हानात्मकही आहे  आणि त्याहून जास्त liberating आहे!
(अजून एक, आपण बऱ्याचदा संवाद म्हणतो, तेव्हा आपल्याला कधी कधी फक्त श्रोता हवा असतो; आणि भूमिकांची अदलाबदल करण्याची संधी समोरच्याला मिळाली नाही की तो थकतो, कंटाळतो...😊...बॅटिंगचा टर्न फिरत राहिला पाहिजे, सगळेच चांगले बॅट्समन नसले तरी 😊 )



No comments:

Post a Comment