परवा एका मैत्रिणीने खुसरोच्या एका रचनेचा उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने थोडं वाचत असताना बदलत चाललेल्या कव्वाली या संगीत प्रकाराबद्दल एक विस्तृत लेख वाचण्यात आला. आणि त्यावर विचार करता करता सूफीजम आणि कव्वाली याबद्दल मला असलेल्या मर्यादित ज्ञानाची उजळणी झाली.
कव्वाली या संगीतप्रकाराचा उगम सूफी संप्रदायात झाला; क़ौल म्हणजे कथन, प्रवचन... ते सांगीतिक भाषेत सांगणारा तो कव्वाल आणि तो जी रचना गातो ती कव्वाली.
सूफीजम हा इस्लाम धर्मातला गूढ पंथ.
ईश्वराविषयी अत्यंतिक भक्ती आणि प्रेम भावनेला महत्व देणारा. इश्क(समर्पण) हा आत्मज्ञान(मरीफत)/देव/मोक्ष प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे असे मानणारा.
जग हे ईश्वरीय तत्वाचे प्रतिबिंब आहे आणि मनुष्य त्या ईश्वरी तेजाचे सगुण रूप. या परमज्ञानाची अनुभूती घेण्याचा आणि त्या तेजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न प्रत्येक जीव करत असतो.
स्वतःला सगुण साकार रुपात अनुभवण्यासाठी 'त्याने' मनुष्य नावाचे साधन निर्माण केले; त्या साधनाला परत त्या निर्मात्यापर्यंत प्रवास करता येतो, 'त्याला' अनुभवता येते. त्यासाठी स्व चे अस्तित्व पूर्णपणे विलीन करावे लागते ... हे विसाल(जिवा शिवाचे ऐक्य) साधण्यासाठी, त्या ईश्वराशी एकरूप होण्यासाठी कव्वालीतून निर्माण होणारा ट्रान्स( हाल) मदत करतो.
(सूफीजम मधली ही संकल्पना आत्मा परमात्मा कल्पनेशी साधर्म्य दाखवते, आणि त्यातले इश्क आपल्या भक्ती योगाशी.)
कव्वाली आधी फक्त दर्ग्यांमध्ये तिथे येणाऱ्या भाविकांसाठी सादर केली जात असे. ताल वाद्य आणि रूपके पेरलेली शब्दयोजना वापरून कव्वाल पार्टी अशी वातावरण निर्मिती करायची की ऐकणारे भाविक तल्लीन व्हायचे आणि ब्रह्मानंदी टाळी लागणे, याचा प्रत्यय त्यांना यायचा. निष्णात कव्वाल विशिष्ट शब्दांची आवर्तने घेत, आलापांचा आणि ठेक्याचा वापर करत श्रोत्यांना एका वेगळ्या प्रतलावर आनंदातिरेकाच्या स्थितीत न्यायचे(ecstasy). त्या स्थितीत मग आत्मज्ञानाची अनुभूती होणे अपेक्षित असायचे.
अशी ही पारंपारिक कव्वाली सादर करणारी कव्वालांची घराणी असतात, आणि ती बहुतांश वेळा एखाद्या सूफी संताचा वारसा सांगतात. कव्वाल पार्टीतले साथीदार सहसा एकमेकांचे नातेवाईक असतात.
पारंपारिक कव्वालीच्या कार्यक्रमात सादर केल्या जाणाऱ्या कव्वाल्यांचे प्रकार असतात:
हम्द: यात अल्लाहची स्तुती असते(उदा. अल्लाह हू ही कव्वाली). कार्यक्रमाची सुरुवात याने होते.
नात: यात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची स्तुती असते.
मन्कबत: यात इमाम अली किंवा एखाद्या सूफी संताची स्तुती असते.
मर्सिया: यात इमाम हुसेन यांच्या करबलाच्या युद्धात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जातो. ही शिया पंथियांच्या कार्यक्रमात सादर होते.
गझल: इतर वेळी गझल प्रेमगीत असली तरी कव्वालीच्या कार्यक्रमात सादर होताना
यातली माशुक प्रतिकात्मक असून प्रत्यक्षात वर्णन ईश्वराचे आणि त्याच्याशी मिलन होण्यासाठीच्या तळमळीचे असते.
पारंपारिक कव्वालीत काही शब्दांची बरीच आवर्तने घेतली जातात. त्यात त्या शब्दांचे वरवरचे अर्थ गळून जाऊन रुपकांत दडलेले मूळ अर्थ उलगडत जावेत, हा हेतू असतो.
या दृष्टीने पाहिलं की मग प्रेमगीत प्रेमगीत राहात नाही; त्यातले छुपे अर्थ दिसू लागतात..उदा. 'ये जो हलका हलका सुरूर है' चा हा भाग...
ना नमाज़ आती है मुझको,
न वजू आता है
सजदा कर लेता हूँ,
जब सामने तू आता है
मैं अज़ल से बन्दा-ए-इश्क हूँ
मुझे ज़ोह्द-ओ-कुफ्र का ग़म नहीं
मेरे सर को दर तेरा मिल गया
मुझे अब तलाश-ए-हरम नहीं
मेरी बंदगी है वो बंदगी
जो बा-कैद-ए-दैर-ओ-हरम नहीं
मेरा इक नज़र तुम्हें देखना
बा खुदा नमाज़ से कम नहीं..
अशी ही अध्यात्मिक अनुभवाचे वाहन असणारी कव्वाली कालौघात बदलत गेली.
संपर्क क्रांती झाली आणि दर्ग्याचा उंबरठा ओलांडून कव्वालीचा मैफिलींमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांत प्रवेश झाला. ध्वनिमुद्रिका निघू लागल्या.
या स्थित्यंतरासोबत कव्वालीचे रूपही बदलले. ती आटोपशीर होत गेली. स्थळ काळाचे बंधन राहिले नाही; घरबसल्या कुणालाही कव्वालीचा आनंद घेणे शक्य झाले.
बऱ्याचदा शब्दशः अर्थ घेतले गेले, त्यामुळे काही कव्वाल्या प्रेमगीत म्हणून प्रसिद्ध झाल्या; 'दमादम मस्त कलंदर' सारख्या रचना तर डान्स नंबर म्हणून स्थापित झाल्या. कलाकार, सांगीतिक बाजू, सादरीकरण , सोपी शब्दरचना, ग्राहक यांना महत्व आले.
हिंदी चित्रपटांमध्ये तर कव्वाली तिच्या मूळ रुपात क्वचित आली. 'निगाहें मिलाने को जी चाहता है', 'अल्लाह, ये अदा' सारखी ती कधी खट्याळ मूड घेऊन आली, तर 'राज की बात कह दू तो' सारखी कधी कलगीतुऱ्याच्या स्वरूपात.
एकुणात अध्यात्मिक संदर्भ हळूहळू दूर गेले आणि कव्वाली रंजक संगीतप्रकार म्हणून जास्त ओळखली जाऊ लागली.
कव्वालीवरच्या त्या लेखात या सगळ्या स्थित्यंतराबद्दल खंत जाणवत होती; मलाही वाटली. आपल्याकडचे लुप्त होत चाललेले कलाप्रकार आठवले, त्याचबरोबर कालानुरूप खूप बदलत गेलेले काही कलाप्रकारही... काळाच्या रेट्यासमोर एखादी गोष्ट शुद्ध स्वरूपात टिकणं कठीण आहे याची जाणीव झाली. मूळ स्वरूप काटेकोरपणे जपून नामशेष होण्याचा धोका पत्करायचा, की काळासोबत स्वतःत बदल घडवत हिणकस स्वरूपात टिकून राहायचे, हा पेच तसा कठीण.
डोक्यात हाच विषय घोळत होता आणि त्यामुळे फोनवर प्लेलिस्टही नुसरत फतेह अली खान यांचीच सुरू होती.
(कव्वाली हा विषय यांच्याशिवाय खरोखर अपूर्ण; तिला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे श्रेय यांनाच. जगभर कंसर्ट्स करणारे नुसरतसाहेब दर्ग्यांमधल्या पारंपारिक कव्वाली कार्यक्रमांमध्येही न चुकता सहभागी व्हायचे.)
'अल्लाह हू' चे एक संक्षिप्त व्हर्जन झाले; मग त्याचेच एक जुने दीर्घ रेकॉर्डिंग सुरू झाले. मी आवराआवर करत होते; गाणे पुढे पुढे सरकू लागले तसे काम करणे अशक्य झाले. कंप सुटला; तो थंडीचा शहारा नक्कीच नव्हता. मी डोळे मिटून स्तब्ध बसून राहिले, नकळत डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. 'समा' नावाची एक संकल्पना आहे कव्वालीत, ती बरीच वाचूनही कळली नव्हती; पण त्या काही क्षणांमध्ये ती प्रचिती आली.
मग लेख वाचताना वाटलेली खंत नाहीशी झाली. संपर्कमाध्यमे नसती तर माझ्यासारख्या असंख्य लोकांना हा स्वर्गीय अनुभव कसा घेता आला असता? हा कलाप्रकार तरी या स्वरूपात कसा ऐकता आला असता? The lost soul हे त्या लेखाचे शीर्षक मग तितके चपखल वाटेना... आत्मा फक्त रूप बदलतो, हरवत नाही; हा सिद्धांत जास्त पटला!
----- ------- ------- ------ ------ -------
( कव्वालीने रूप बदलले आहे हे मात्र खरे; वानगीदाखल 'ये जो हलका हलका' ची दोन व्हर्जन्स कमेंटमध्ये दिली आहेत. अध्यात्मिक अँगल बाजूला ठेऊन musical brilliance साठी ही गीते आवडू शकतात. हे ऐकून अजून खोल जावं वाटलंच, तर तो बोनस... 😊)