Friday, 26 February 2021

कोरोना १

 वातावरण घबराटीचे  आहे आणि ते दूर कसे करायचे ते कळत नाहीय. 

खरे तर करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने बऱ्याच केसेसमध्ये सौम्य प्रकारचा आजार होतो, पण सध्या यावर नेमका उपचार उपलब्ध नसल्यामुळे भीती आहे.

 परदेशात ट्रिपला जाऊन आलेल्या पुण्यातल्या एका ग्रुपमध्ये काही रुग्ण आढळले आहेत.

 त्या जथ्यातले कितीजण बाधित होते, ते सगळे भारतात आल्यानंतर कितीजणांच्या संपर्कात आले असतील, याबद्दलच्या तर्क- वितर्कांमुळे गोंधळ वाढतो आहे. त्यात भर म्हणून विशिष्ट सोसायटीज मध्ये सर्वांच्या तपासण्या होत असल्याच्या, ऑफिसेस, काही शाळा बंद होण्याच्या बातम्या येत आहेत. (माझ्या मुलीची शाळा उद्या सुरू होणार होती, पण आता सोमवारपर्यंत सुट्टी दिली आहे.)

व्हाट्सअप्प वर फिरणारे मेसेज, त्या दुबई ट्रीपला गेलेल्या प्रवाशांची नावे असलेली यादी, बाधित व्यक्तींचे फोटो, हे सगळे प्रकार तर धन्य आहेत.


एक लक्षात घ्यायला हवे की आता काँटॅक्ट्स काटेकोरपणे ट्रेस होणं कठीण आहे. जशी संख्या वाढत जाते तसे अप्रत्यक्ष संपर्क(indirect contacts) शोधणे शक्य होत नाही. त्यात अशी हिस्टरी लपवली जाण्याचीही शक्यता असणार आहे.


आता लक्षणे पाहून ठरवावे लागणार; त्यातही प्रत्येक खोकला ताप सर्दी असणाऱ्याचे टेस्टिंग करणे कठीण जाणार आहे.

स्वच्छतेचे उपाय अवलंबणे, अकारण गर्दीत जाणे टाळणे, आणि काही संशयास्पद लक्षणे आढळली( खोकला, ताप, सर्दी, अंगदुखी, ) तर वैद्यकीय सल्ला घेणे, इतके करावे.  

इन्फेक्शन झाले तरी बहुतांश केसेसमध्ये सौम्य स्वरूपाचे असते हे लक्षात ठेवावे.

प्रत्येक पेशंटचे व्हायरल टेस्टिंग करणे शक्य नाही. जे खरोखर संशयास्पद वाटतील त्यांना डॉक्टर त्यासाठी पाठवतीलच. या बाबतीत डॉक्टरांशी हुज्जत घालू नये. डॉक्टर तुमचे फोबियाज एंटरटेन नाही करू शकत. 


आणि


शहानिशा न करता भीती वाढवणारे मेसेजेस किंवा बाधित रुग्णांचे फोटो, वैयक्तिक माहिती फॉरवर्ड करू नये. हे फार महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment